'उरी' चित्रपट पाहिला आणि त्या विषयी लिहावे असे मनापासून वाटले. कोणताही खरा देशाभिमानी ह्या चित्रपटावर आक्षेप घेऊ शकणार नाही किंवा काही टीका करू शकणार नाही.
सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना पाहून आपल्यालाही स्फुरण चढते. हा तर एक सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे.
आपण आपल्या सुखासीन आयुष्यात जगताना लष्करात भरती होणाऱ्या जवानांच्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही हे मला खूप तीव्रतेने जाणवले.
चित्रपट बघत असताना मला तो दहशतवादी हल्ला, त्यात निशस्त्र सैनिकांचे मारले जाणे हे बघवले देखील जात नव्हते. ते प्रत्यक्ष अनुभवताना सैनिकांची काय अवस्था
झाली असेल हा विचारांनी मी खूप अस्वस्थ झाले. त्यांचे खाजगी वैयक्तिक आयुष्य पाहून तर मला माझ्या कम्फर्ट झोन ची लाज वाटली.
आत्तापर्यंत मला स्वतःचे खूप कौतुक होते की, मी समाजासाठी काहीतरी करते. पण या चित्रपटाने मला ताळ्यावर आणले आणि मी करत असलेलं काम किती क्षुल्लक आहे याची जाणीव मला प्रथमच झाली.
महत्त्वाचं म्हणजे काश्मीरमधील सैनिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने जे प्रत्युत्तर दिले, ते आजवर स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्याला जमले नव्हते. ते पाहून देशाभिमान तर जागृत होतोच पण भारताला एक करारी, स्वाभिमानी, धाडसी, कर्तुत्ववान आणि माणुसकीची जाण असलेले व्यक्तिमत्व पंतप्रधान म्हणून लाभले याचा मनापासून आनंद आणि अभिमान वाटतो. मोदींना फक्त बीजेपीच्या चष्म्यातून बघणे बंद केले पाहिजे. बीजेपी हे एक त्यांना पंतप्रधानपद बहाल करणारे साधन आहे. बरीचशी जनता त्या साधना वरच लक्ष ठेवून आहेत. पण या निधड्या छातीच्या माणसाकडे व्यक्ती म्हणून डोळसपणे बघण्याची गरज आहे.
शिवाय आपल्या लष्करी जवानांची ताकद आणि त्यांची देशाप्रती असलेली निष्ठा मी अनुभवली.
त्यांचं स्वतःला झोकून देणे, जीवाची आणि कुटुंबियांची पर्वा न करता फक्त देशासाठी लढणे आणि समर्पण म्हणजे काय हे त्या सैनिकांकडे बघून कळते. शत्रूच्या गोटात स्वतः घुसायचे आहे; तिथून जिवंत परतणार कि नाही याची काहीही शाश्वती नाही तरीही मोठ्या उत्साहात आणि धैर्याने लढायला तयार!! कुठून येते धाडस त्यांच्या अंगात?
पाकव्याप्त काश्मीर मध्ये घुसून आपल्या जवानांनी जे शौर्य गाजवले ते प्रत्येकाने नक्कीच बघितले पाहिजे. प्रखर बुद्धिमत्ता, निर्णय घेण्याची आणि तो निभवण्याची क्षमता असलेले नेतृत्व लाभले की जिंकण्याची उमेद, उत्साह आणि देशाप्रतीचा अभिमान कसा उत्पन्न होतो याची झलक या चित्रपटात पहायला मिळते.
कोणी यावर टीका करेल की आता निवडणुका जवळ आल्या म्हणून असे चित्रपट दाखवले जात आहेत. पण आजपर्यंत असा स्वाभिमान जागृत होईल असे काही घडले आहे का? असले तरी ते दाखवणारा कोणी मज्जाव केला होता का?
आणि ज्यांच्यामुळे हे घडले त्यांनी ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे चुकीचे आहे का?
मी काही राजकारणी व्यक्ती नाही कोणत्याही पक्षाची पुरस्कर्ती नाही. पण जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे.
पूर्ण चित्रपट बघताना टाळ्यांचा गडगडाट, भारतमाता की जय अशा घोषणांनी चित्रपटगृह दणाणून गेले होते. सर्वसामान्यांमध्ये देशाभिमान जागृत करण्याची क्षमता या चित्रपटात आहे.
याचे श्रेय या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला तर आहेच पण हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे हे विसरून चालणार नाही. संगीत, दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी सगळ्याच बाबतीत हा चित्रपट खूप उजवा आहे.
विकी कौशल ने मेजर विहान ची प्रमुख भूमिका ज्या प्रकारे साकारली आहे त्याला तोडच नाही.
आज मला अभिमान वाटतो की मी भारतीय आहे आणि एक कणखर नेतृत्वाची भक्कम फळी आपले संरक्षण करत आहे.
आता उर्वरित आयुष्यात सैनिकांसाठी जे काय करता येईल ते करायचे असा निश्चय मी केला आहे.
_मंजुषा देशपांडे, पूणे.
ReplyForward
|
Very nicely explained the abstract of film and it's truly motivational....we really owe to our soldiers and need such a leaders for health of nation....
ReplyDeleteVery good writing....
Thanks a lot
Deleteखूप छान चित्रपट समीक्षण, .......
ReplyDeleteKeep it up !!
Thanks a lot
DeleteGreat review and experience telling!
ReplyDeleteSalute to our soldiers.
Keep it up Mom!
Very well said maushi...👏👏👍👍
ReplyDeleteतुझ्या शब्दांमध्ये एका Movie चा अनुभव द्यायची ताकद आहे.. Thank you ह्या अनुभवासाठी आणि आपल्या सैनिक बांधवांना सलाम🙏
ReplyDeleteThanks dear
Delete
ReplyDeleteUri The Surgical Strike Full Movie Download Click Here
Latest Hollywood, Bollywood & Web Series Free Download Click Here