लेख मंजुषा

Happy Anniversary “हॅप्पी ऍनिव्हर्सरी डियर !!!” नवऱ्याने सकाळी सकाळी बायकोला शुभेच्छा दिल्या आणि विचारले, ” काय गिफ्ट हवे तुला?” ती लगेच म्ह...

Friday, 20 September 2019

काव्य मंजुषा (कविता- जाग)

गाढ झोपेतून एकदा अचानक मला
जाग आली
माझ्या विश्वात डोकावून बघण्याची खूप
घाई झाली

आपल्याशिवाय सर्वकाही सुरळीत पाहून
मन हेलावले
उद्विग्न मनास वाटले की आजवर
कोणासाठी  जगले

कोणी रडावे कोणाचे अडावे असे
नाही वाटले
पण आपल्याशिवाय जग चालते हे
सत्य उमगले

प्रेम विरह सुख दु:खं सर्वकाही
खोटं असतं
अखेरीस आपणच आपले सोबती हेच
खरं असते

जे आपले नसते  त्यासाठी आपण
धडपडत असतो
त्या स्वप्नमय विश्वात अखेरपर्यंत
जगत असतो

वेळीच यावी जाग थांबविण्या रमणे
फसव्या विश्वात
निर्लेप होऊन  जगावे प्रत्येक सेकंद
स्व शोधात

मनस्विनी 


-मंजुषा देशपांडे, पुणे.







11 comments:

  1. खूपच छान कविता, " जण पळ भर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय? " ही भा. रा.तांबेंची कविता आठवली. कवितेची रचना चांगली केली आहे. शीर्षक " कविता जाग " असे वाचले जाते. कविता --जाग

    ReplyDelete
  2. जन पळ भर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय? ........ असे वाचावे

    ReplyDelete